
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात काही शिक्षकांनी बारावी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र स्व राज्य सरकारचा पारदर्शी पॅड उर्फ तगड वापरण्याचा जीआर आहे असे खोटे सांगून बारावी व दहावीच्या लाखो संख्येमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नकली बनाव करून पारदर्शी तगड वापरण्याचा अनेक स्टेशनरी दुकानांमध्ये बनावट प्रचार सुरू आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने सक्तीचे केले आहे असे खोटे व्यापारी व शिक्षकाकडून सांगितले जात आहे या घटनेचा अखिल भारतीय हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासणे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

त्यांनी आपल्या निवेदनामध्ये या व्यापारी व शिक्षणाच्या माध्यमातून घडणाऱ्या भ्रष्टाचाराला आम्ही निश्चितच आळा घालू असे निवेदनाद्वारे कळवले आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जन आंदोलन च्या श्रीमती शिला माने व महिला अध्यक्ष सौ शोभाताई शेलार पाटील यांनीही या शिक्षण पद्धतीतील शिक्षण पद्धतीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून या कपटी कारवाईला त्वरित आळा घालण्यासाठी शिक्षण मंत्री व दहावी बारावी बोर्ड समितीला भेटणार आहोत असे सांगितले यावेळी शिवसेना युवा सेना अध्यक्ष कुणाल शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच अखिल भारत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चे उत्तम पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.
