सोन्याचे दर घसरले…..

मुंबई: सोन्याचे दर सातत्याने घसरताना दिसत आहेत. डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे सोन्याचे भाव घसरले आहेत. देशांतर्गत बाजारात सोने पुन्हा एकदा ५६ हजारांच्या खाली आले आहे.

या वर्षी फ्युचर्स मार्केटमध्ये सोने ५८,८०० च्या वर गेले आहे. पण या महिन्यात सोन्यामध्ये सातत्याने घसरण होत असून, त्यानंतर ते आतापर्यंत सुमारे ३,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज, गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडल्यानंतर सोन्याने मोठी घसरण नोंदवली.१६० रुपयांच्या घसरणीसह किंवा ०.२९% च्या घसरणीसह, सोने फ्यूचर सुरुवातीच्या काळात ५५,९२३ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. मागील सत्रात त्याची किंमत ५६,०८३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.सिल्व्हर फ्युचरची किंमत वायदे बाजारात आज चांदीचा दरही घसरणीसह उघडला. सुरुवातीच्या काळात ९९ रुपयांची किंवा ०.१५% ची घसरण नोंदवली आणि सुमारे ६५,३३९ वर उघडली. मागील सत्रात तो ६५,४३८ रुपयांवर बंद झाला होता. सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव जागतिक बाजारात सोने चांदीच्या किमतीत वाढ होत असताना, दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव ९० रुपयांनी वाढून ५६,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५६,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही ११३ रुपयांनी वाढून ६६,०८३ रुपये प्रति किलोवर बंद झाला

🤙 8080365706