
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर मागील 4 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीही निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे.

जर, बहुमत चाचणीला सामोर गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांची भूमिका, शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी का गेले, यावर जोरदार युक्तिवाद झाला.
