केजरीवाल यांच्या पीएला थेट ईडीकडून समन्स…

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अशात केजरीवाल यांच्या पीएला आता थेट ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यामुळे आता दिल्लीतील राजकारण चांगलच तापणार असल्याचे बोलले जात आहे.दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पीएला समन्स बजावले आहे. याआधी सुरु असलेल्या घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने त्यांना हा समन्स बजावले असलयाचे समजते. यापूर्वी सीबीआयने या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही समन्स बजावले होते.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. या समन्सवरून सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले की, सरकारने माझ्याविरुद्ध ईडी, सीबीआयसह अनेक एजन्सींना गुंतवून ठेवले आहे, अनेक वेळा छापेही टाकण्यात आले आहेत, परंतु अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मी तपासात सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहीन असेही सिसोदिया यांनी सांगितले होते.

🤙 8080365706