
कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफयांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या हे आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. “आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा १५८ कोटीचा दिसत होता. तो तब्बल ५०० कोटीहून अधिक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मुश्रीफ यांनी बँकेलाही सोडलं नाही. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यालाही हसन मुश्रीफ यांनी अशा पद्धतीने लुटले की आता त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मी आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट देणार आहे. चौकशी आणि पाठपुरावा करणार आहे”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
