पन्हाळगडावर ‘जनसुराज्यचषक’ निमंत्रितांच्या व्हाँलीबाँल स्पर्धेचे आयोजन

पन्हाळा : पन्हाळा आणि  व्हाँलीबाँल खेळाचे नाते अतुट आहे.याच पन्हाळ्यावर येत्या 25 व 26 फेब्रुवारी रोजी पन्हाळ्याचे माजी नगराघ्यक्ष कै.प्रभाकर भोसले व माजी जिल्हा परिषद सदस्य कै.बाजीराव नलवडे यांच्या स्मणार्थ. संघर्ष क्रिडा मंडळ,पन्हाळा यांच्या वतीने ‘जनसुराज्य चषक’निमंत्रितांच्या (पुरुष) व्हाँलीबाँल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती संघर्ष क्रिडा मंडळाचे अध्यक्ष मारुती काशिद यांनी दिली.

पन्हाळ्यात दरवर्षी राज्यस्तरीय व्हाँलीबाँल स्पर्धेचे आयोजन करण्याची परंपरा संघर्य क्रिडा मंडळाने गैल्या अनेक वर्षापासुन जोपासली आहे.मात्र कोरोना मुळे दोन-तीन वर्षे यापरंपरेत खंड पडला.पण पुन्हा एकदा संघर्ष क्रिडा मंडळाच्यावतीने स्पर्धा घेण्यास सुरुवात केली आहे  संघर्ष क्रिडा मंडळ यांच्या वतीने व जिल्हा व्हाँलीबाँल असोशिएशन च्या मान्यतेने  कोल्हापुर जिल्ह्यातील निमंत्रित आठ संघाच्या(पुरुष) व्हाँलीबाँल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सदरच्या स्पर्धा या शनिवार 25 व रविवार 26 फेब्रुवारी  अशा दोन दिवस डे-नाईट होणार आहेत.स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडुंची जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असुन यास्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य व्हाँलीबाँल संघटनेचे अधिक्रुत पंच काम पाहणार आहेत.या पंचाची देखील प्रवास खर्चासह,राहणे व जेवणाची सोय मंडळाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे मारुती काशिद यांनी सांगितले.

शनिवारी 25 तारखेला सांयकाळी सात वाजता स्पर्धेचे औपचारिक उद्धाटन शाहुवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय.कोरे यांच्या हस्ते तर गोकुळचे संचालक करणसिंग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तर 26 फेब्रुवारीला अंतिम सामन्यानंतर मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

सध्या मैदान करण्यासह इतर तयारी देखील सुरु असुन यास्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष चैतन्य.भोसले,सुनील हावळ,सचिव योगेश वराळे, सहसचिव अबिद मोकाशी,जमिर गारदी, रविंद्र धडेल,कपिल खोत, पुथ्वीराज नायकवडी, शशिकांत बच्चे,गणेश पोवार आदी परिश्रम घेत आहेत.

🤙 8080365706