खाशाबा जाधव यांच्यांवर चित्रपट

कोल्हापूर : क्रीडा क्षेत्रावरील यश मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये मराठमोळ्या व्यक्तीमत्वावरील चित्रपटाची भर पडणार आहे. कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांची उपस्थिती होती.कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी केलीय. यावेळी माजी आरोग्य राज्यमंत्री आ.राजेंद्र पाटील यड्रावकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे उपस्थित होते.

🤙 8080365706