गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा

मुंबई : दिवाळीनंतर आता गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त देखील १०० रूपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज (दि.२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

याचा राज्यातील १ लाख ६३ हजार शिधा पत्रिकाधारकांना लाभ मिळणार आहे.अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देऊन त्यांची दिवाळी आणखी गोड करण्याचा प्रयत्न राज्यसरकारने केला होता. यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट दिले होते. त्यानंतर आता आणखी एक निर्णय आज सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधा पत्रिकाधारकांना १०० रूपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

🤙 8080365706