धारावी झोपडपट्टी जवळील शाहूनगर मध्ये भीषण आग….

मुंबई : पहाटे चार वाजेच्या दरम्यान धारवी झोपडपट्टीजवळील शाहूनगरच्या कमलानगर येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 25 हून अधिक घरांना ही लागल्याची माहिती समोर आली आहे.

पहाटेच्या वेळेला आग लागताच नागरिकांनी  मुंबई  महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

मात्र, अरुंद जागा असल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यास अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. आगीची भीषणता मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अद्यापही आग धुमसतेच आहे.धारावी जवळील शाहूनगर मधील कमला नगर मधील आगीच्या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची घटना घडतात परिसरातील नागरिक सतर्क झाले होते.

🤙 8080365706