सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग ३ दिवस सुनावणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग ३ दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की ५ न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय.

आता ३ दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी धाव घेतली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणी सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यास नकार देऊन यावर मंगळवारी सुनावणी होईल असे जाहीर केलं आहे.

🤙 8080365706