मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; आज महत्त्वाची बैठक

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्हं एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये आले आहे.शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार आहे. तर या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706