
मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट अधिक सक्रिय झाला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्ष मिळाल्यानंतर उद्या पहिल्यांदा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या कार्यकारणीच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न होणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार असून ते सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसह पक्षाचे पदाधिकारी, खासदार आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
