महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडच्या वाघीणीसाठी आलीय ; पंकजा मुंडे

पिपंरी : मोठ्या संख्येने मराठवाड्यातील मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सभा घेतली.त्यात त्यांनी महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडच्या वाघीणीसाठी आल्याचे सांगितले.

चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. लक्ष्मणभाऊंच्या निधनामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी अश्विनीताई भरून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लक्ष्मणभाऊंचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अश्विनीताईंना आशिर्वाद द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मी येथे आले हे सफल झाले पाहिजे, मला मान खाली घालायला लागली नाही पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी `कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली`अशी जोरदार घोषणाबाजी उपस्थितांनी केली. तो धागा पकडून महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडची वाघीण अश्विनीताईंसाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

🤙 8080365706