जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरून वाद

दिल्ली : दिल्लीच्या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात म्हणजे जेएनयुमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीवरुन, शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरून वाद निर्माण झाला आहे. शिवरायांचा फोटो फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आज तकने दिलेल्या माहितीनुसार, डाव्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा खाली फेकल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केला आहे. तर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा डावे करत आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असून, विद्यापीठाकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.घडलेल्या घटनेचे फोटो अभाविपने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शिवरायांची प्रतिमा खाली पडलेली दिसत आहे. इतकेच नव्हे तर जमिनीवर हार देखील फेकलेला दिसत आहे.

🤙 8080365706