रक्त शुद्ध होण्यासाठी उत्तम आहार गरजेचाच…

संपूर्ण शरीराला शुद्ध रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आपलं रक्त अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतंहेच रक्त अधिकाधिक शुद्ध आणि स्वच्छ असावं यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.

लोह, व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी युक्त आहार घेतल्यास लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढण्यास आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत होते. तुमच्या शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला सक्षम ठेवण्यासाठी हे लोहयुक्त पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करायला हवा. हे पदार्थ कोणते ते पाहूया…

गव्हांकुराचा रस, काकवी, राजमा आणि टोफू या पदार्थांमुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते. आपण हे पदार्थ आहारात घेतोच असे नाही. मात्र उत्तम आरोग्यासाठी हे पदार्थ फायदेशीर ठरतात.

पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये रक्त शुद्ध आणि स्वच्छ करणारे आरोग्याला आवश्यक असणारे घटक असतात. तसेच पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे इतरही घटक असतात, म्हणून आहारात आवर्जून पालेभाज्यांचा समावेश करायला हवा. 

🤙 8080365706