मातोश्री निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी..

मुंबई : केंद्रिय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यामुळे ठाकरे गटासह राज्याला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर काल सकाळपासून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

या जमलेल्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे भेटले. उद्धव ठाकरे यांनी ओपन जीपमधून त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी काही कार्यकर्ते पुण्याहून आले होते. या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे.युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्रीबाहेर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर “काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत”, अशा आशयाचं पोस्टर मातोश्रीबाहेर झळकलं आहे. मातोश्रीबाहेर पुण्यातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलीय. ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते.

🤙 8080365706