कागल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कागल : सालाबादप्रमाणे या वर्षी ही महाराष्ट्रांचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजयाची जयंती, श्री छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांचे वतीने विविध उपक्रमांनी साजरी झाली.

या जयंती सोहळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदीता घाटगे ,राजे वीरेंद्रसिंह घाटगे व सौ श्रेयादेवी वि.घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुरवातीस बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास राजे समरर्जीतसिंह घाटगे,राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकाळी 10.30 वाजता राजे वीरेंद्रसिंह घाटगे व सौ श्रेयादेवी वि.घाटगे या उभयतांचे हस्ते, शिव छत्रपतींच्या उत्सव मूर्तीस विधिवत अभिषेक करण्यात आला.

सकाळी दहा ते बारा या कालावधीत श्रीराम मंदिर कागल येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यामध्ये लेझीम पथक व धनगरी ढोल वादन यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली दुपारी 12 .30 वाजता महिलांच्या भाऊ गर्दीत शिवजन्म काळ सोहळा संपन्न झाला. शिवछत्रपती यांच्या पाळण्याचे गायन महिलांनी सुरेल व मधुर आवाजात केले.तत्पूर्वी शिवज्योतिचे स्वागत राजे समरजितसिंह व युवराज आर्यवीर यांनी केले.

यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सकाळी स्टॅन्ड वरील श्रीमंत बाळ महाराज व नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच खर्डेकर चौकातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शाहूचे संचालक यशवंत माने , सतीश पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी , आनंदा पसारे राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, प्रकाश पाटील, राजेंद्र जाधव, उमेश सावंत बाबगोंडा पाटील, धैर्यशील इंगळे,दीपक मगर, आप्पासाहेब भोसले,सतिश माळी,बाळू नाईक, विवेक कुलकर्णी,अरूण गुरव,असिफ मुल्ला, संभाजी नाईक, विठ्ठल निंबाळकर, आप्पासो हुचे, गजानन माने यांच्यासह सौ सुधा कदम सौ. नम्रता कुलकर्णी, सौ.शितल घाटगे सौ जयश्री कोरवी,शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यक्रमास,सर्व शिवभक्त, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

🤙 8080365706