ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याचे तोटे..

केसांची काळजी घ्यायची असेल तर, केस धुणे आणि केस वाळवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. ओल्या केसांवर अशा प्रकारे टॉवेल बांधून ठेवल्याने केसांचे नुकसान होऊ शकते.

केस होऊ शकतात ड्राय :- ओल्या केसांवर टॉवेल बांधून ठेवल्याने केसांची मुळे तसेच नसांवर एक प्रकारचा ताण येतो. यामुळे केसांच्या मुळांना व नसांना इजा होऊन केस फारच रुक्ष किंवा कोरडे पडू शकतात.ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळ्याने आपले केस आणि टॉवेल यांच्यात एक प्रकारचे घर्षण निर्माण होते. यामुळे केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात. कारण जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.

केस तुटू शकतात :-

केस धुतल्यानंतर तशाच ओल्या केसांवर टॉवेल बांधून ठेवल्याने कमजोर केसांना इजा पोहोचून ते तुटण्याची समस्या उद्भवू शकते. कमजोर केसांसोबतच मजबूत किंवा चांगले केसदेखील टॉवेलच्या छोट्या धाग्यांमध्ये अडकून तुटू शकतात. केस ओले असताना फार नाजूक असतात. अशावेळी केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचं टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात.

केस गळती सुरु होऊ शकते :

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळ्याने आपले केस टॉवेलमध्ये बराच काळ राहून टॉवेलसोबत झालेल्या घर्षणाने दुमडू लागतात.   केस दुमडल्याने त्यावर अतिरिक्त ताण येऊन ते आपोआप तुटू लागतात. ओल्या केसांवर बराच काळ टॉवेल गुंडाळून ठेवल्याने केसांचे सौंदर्य खराब होते. यामुळे केसांचे आरोग्य कमजोर होऊन केस गळती सुरु होते.

केसांची नैसर्गिक चमक होईल नाहीशी :-

शॅम्पूने केस धुतल्यानंतर ओले केस टॉवेलने बांधण्याची अनेक स्त्रियांना सवय असते. आंघोळीनंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस ताणले जाऊन भरपूर प्रमाणात गळू शकतात. असे केल्याने केसांच्या नसा कमकुवत होऊ लागतात. वारंवार ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसांची नैसर्गिक चमक नाहीशी होऊन केस कोरडे व रुक्ष दिसू लागतील. केसांची काळजी घ्यायची असेल तर, केस धुणे आणि केस वाळवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. ओल्या केसांवर अशा प्रकारे टॉवेल बांधून ठेवल्याने केसांचे नुकसान होऊ शकते.

🤙 8080365706