
कोल्हापूर : उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील बेरोजगार मराठी युवक/युवतीसाठी आयोजित भव्य रोजगार मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ: देवचंद कॉलेज,अर्जुननगर कागल), दुपारी 2 वाजता श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान, कणेरीमठ, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोस्तव शोभायात्रा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.
(स्थळ: गांधी मैदान, कोल्हापूर), दुपारी 3 वाजता सांगलीकडे प्रयाण
