
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हलचालींना वेग आला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी विस्तार करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अशात उद्या (रविवारी) ते कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर या हालचाली वाढल्याचं दिसत आहे.
