शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला

मुंबई : देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची आगामी रणनीती काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती.

ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत केले जात आहे. तर या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

🤙 8080365706