
कोल्हापूर : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर प्रथम वर्ष डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक कंपनीस भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम वर्ष डी फार्मसी विद्यार्थ्यांनी सीमा बायोटेक तळसंदे तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बोट निकल गार्डन येथे भेट देण्यात आले यावेळी सीमा बायोटेक चे मुख्याधिकारी जे. एम. धुमाळ यांनी कंपनीमधील कोणकोणत्या प्रकारच्या जातीच्या रोपांची लागवड केली जाते व ते कोणत्या देशात निर्यात केले जाते याची सविस्तर माहिती दिली तसेच सौ वर्षा दिलीप जाधव विभाग प्रमुख बॉटनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी बोटानिकल गार्डन मधील निरनिराळया औषधी वनस्पती व त्यांचा सध्याच्या समाजामध्ये मानवाच्या जीवनामधील होणारा उपयोग सांगितला सदर भेटीमध्ये महाविद्यालयातील एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या औद्योगिक भैट देण्यासाठी मा डॉक्टर एच एम कदम मानद संचालक भारती विद्यापीठ पुणे विभागीय सांगली प्राचार्य डॉक्टर एच एन मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले डॉक्टर डी. ए. भागवत विभाग प्रमुख डी फार्मसी प्राध्यापक ऋतुजा चौगुले, प्राध्यापक संदीप चौगुले, प्राध्यापक श्वेता रजपूत, प्राध्यापक प्रज्ञा माने, शिक्षक तसेच शिक्षेतर कर्मचारी परिश्रम घेतले.
