
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनात निरोप देण्यात आला. राज्यपाल कोश्यारी आता आपल्या घरी परतणार आहेत. केंद्र सरकारने त्यांना अजून कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.त्यामुळे कोश्यारी यांचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही? याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मात्र, या चर्चा सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपवर मेहरबानी दाखवली आहे. तर शिंदे गटाला ठेंगा दाखवला आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या पदावरून पायउतार होतानाही शिंदे गटाला ठेंगा दाखवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची दहावी जागा रिक्त होती. या जागेवर राज्यपाल कोश्यारी यांनी भाजप गटातील व्यक्तीची वर्णी लावली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या परिचयातील प्रभादेवीतली धनेश सावंत यांची राज्यपाल निर्देशित सिनेट सदस्यपदी वर्णी लागली आहे.
