आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष: भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत.

वृषभ: नोकरी रोजगारात आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल.अचानक लाभ होण्याचे योग आहेत.

मिथुन: शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. अशुभ स्थानातून भ्रमण होत असल्याने देवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

कर्क :नवीन उपक्रम हाती घ्याल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेलचांगल्या विचारांचा लाभ होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत. काहीना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: दिनमान समिश्र फलदायी ठरणारआहे. नोकरीतील वातावरण गैरसमजाचे राहिल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही.याकडे लक्ष द्यावे. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे.

कन्या :नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील.

तूळ :आर्थिक उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहिल. दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. चाण्यक्यनितीचा वापर करून काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकाल.मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्चिक: मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गोठाभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल.प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहिल. संतती सौख्य उत्तम राहिल.

धनु: काहीसा अडचणीत आणणारा त्रासदायक दिवस ठरेल. पती पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खुप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याविरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील.

कुंभ भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही जाणार असलेल्या विशेष एकत्रिकरण सोहळ्यात तुम्ही चमकणार आहात. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला 

मीन म्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. जे लोक विवाहित आहे त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. 

🤙 8080365706