१० वी, १२ वी परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

कोल्हापूर : इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात दि. २१ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२४ या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. १९७३ मधील कलम १४४ अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही कांबळे यांनी कळविले आहे.

🤙 8080365706