
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यासाठी महानगरपालिका आणि जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्या दिवशी ‘ मिशन कमळ’चा नारा दिला जाणार आहे.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास ते अभिवादन करणार आहेत.यासाठी खास जीना बसवण्याचे काम सुरू आहे.कोल्हापूर मधील दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास ते अभिवादन करणार आहेत.या पार्श्वभूमीवर खास जीना बसवण्याचे काम सुरू आहे.या वेळी अभियंता प्रशांत हडकर म्हणाले,19 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या या दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून ते करणार आहेत.त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने छत्रपती शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी कृत्रिम जीना बसवण्याचे काम सुरू आहे. दसरा चौकातील हा छत्रपती शाहूंचा पुतळा उंच असल्यामुळे येथे कृत्रिम जिना बांधणीचे काम करण्यात येत असून हा जिना शासकीय प्रोटोकॉलनुसारच बनवण्यात येणार आहे.इव्हेंट कॉन्ट्रॅक्टर आझम जमादार म्हणाले, अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी छत्रपती शाहूंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जीना बांधणीचे काम आम्हाला देण्यात आले आहे. शासकीय प्रोटोकॉलचा विचार करूनच सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याने थोडा वेळ लागत आहे. पण उद्या संध्याकाळ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. एकूण 16 फूट लांबीचा आणि 4 फूट रुंदीचा हा जीना असणार आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहतील. तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भेट, शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. यानंतर दुपारी त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयासाठी घेतलेल्या नागाळा पार्कमधील नव्या जागेत मंदिर बांधकामाचा प्रारंभ होणार आहे. त्याठिकाणीच भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे.
