सगळी पापं रामकुंडा मध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू; संजय राऊत

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा आहे. इकडे सगळी पापं रामकुंडा मध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिला आहे.

संजय राऊतहे कालपासून नाशिक शहरात आहेत. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना नाशिकमध्ये भगवाच फडकणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नाशिकवर कमळ फुलणार, असा नारा देण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले की, नारा देऊ दे त्यांना, मात्र नाशिकवर भगवाच फडकणार हे लिहून घ्या. बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर अतीव प्रेम होते. मात्र आता गिरीश महाजन यांच्यासारख्या लोकांनी नाशिकची जी परिस्थिती केली आहे, त्यामुळे नाशिककरांना वीट आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं महाअधिवेशन नाशिकमध्ये घेतलं होतं. नाशिक ही पवित्र जागा असून इकडे सगळी पापं रामकुंडामध्ये बुडवली जातात, या भाजपला देखील आम्ही इथेच बुडवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

🤙 8080365706