राज्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएम श्री योजना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील शाळांच्या सक्षमीकरणासाठी पीएम श्री योजना राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ८१६ शाळांचा विकास करण्यात येणार आहे.

त्याचसोबत जेजुरी, सेवाग्राम आणि छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये राज्य शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव आज मांडण्यात आला.राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर तो एकमताने मंजूर करण्यात आला.

🤙 8080365706