
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेषः
आपल्या स्वभावात चंचलता, चिडचिडपणा निर्माण होईल. दुर्घटना गंभीर दुखापतीची शक्यता आहे. आजार उद्भभवतील. शस्त्रक्रीया सारखा घटना संभवतात. मानसिक उत्तेजना व विद्रोह वाढेल. नोकरीत अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात मोठे निर्णय घेऊ नयेत.
वृषभ:
व्यवहार चातुर्य आणि संयमी भुमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. नोकरीत आपल्या कामाप्रती सजग राहा. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. नातेवाईक आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.
मिथुन:
नोकरीत अतिउत्साही आणि अतिरेकपणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.
कर्क:
स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
सिंह:
आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका.व्यापार उद्योगात वाढ होईल.
कन्या:
कार्यक्षेत्रात योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशीर राहिल. नोकरीत नवीन योजनेवर केलेले प्रयत्न सफल होतील. नोकरीत वरिष्ठांकडून केलेल्या कामासाठी दाद मिळेल. हातुन निसटलेल्या संधी पुन्हा प्राप्त होतील. राजकीय सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे.
तूळ :
फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना अनुकुल दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनमनानाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल.
वृश्चिक:
मनोधैर्य कमालीचे उचांवलेले असेल. अनुकुल स्थिती राहणार आहे. नोकरी रोजगारात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल.
धनुः
भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.
मकर:
आपली इच्छापूर्ती व प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना राजाश्रय लाभेल. मान-सम्मान वाढेल. नोकरीत अचानक बदल घडतील. संशोधन क्षेत्रातील मंडळीना मान सन्मान पदवी पुरस्कार मिळेल. व्यापारात आर्थिक गुंतवणूक मोठया प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
कुंभ:
नावलौकिकतेला यशाचाही जोड आज मिळणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. आजचे प्रयत्न सफलदायक ठरतील.विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. शत्रुवर मात कराल. कोर्टकचेरीच्या कामास गती मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहिल.
मीन:
गुरूस्वराशीत असल्याने देव आणि धर्माविषयी विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. लेखन प्रकाशित होईल. स्पर्धापरिक्षेत यश संपादन होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. बँकेत व्यवहार करताना जपून करावा. मुलांकडून समाधान लाभेल.
