
आरोग्य टिप्स : दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. तर जाणून घेऊयात मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय?

सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याचीही शक्यता अशते. डिस्क (मणक्यामधील चकती) सरकल्यास सायटिकाच्या नसांवर दबाव येतो व सायटिकाचे दुखणे वाढते. तसेच मणक्यातील डिस्कमधील पाणी कमी होते. त्यामुळे जी डिस्क धक्का सहन करणाऱ्या स्प्रिंगचे काम करते ती करीत नाही. त्याला डिस्क डिजनरेट होणे असे म्हणतात. त्यामुळे सांध्यांवर ताण येतो आणि पाठदुखी सुरू होते.व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, पाठीत बाक काढून चालायची आणि बसायची सवय यामुळे मागच्या बाजूच्या सांध्यांवर ताण येतो. अनेकदा टूव्हीलर किंवा चारचाकी चालवताना धक्के बसतात. बरेच दिवस हे दुखणे अंगावर काढले तर ही समस्या वाढत जाते आणि भविष्यता त्याचे विपरीत परीणाम दिसायला लागतात.
बसताना शरीराची पोझिशन ताठ हवी, मानही ताठ असायला हवी. मोबाइलचा अतिवापर केल्याने टेक्स नेक सिंड्राोम होऊ शकतो. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर टाळायला हवा. दिवसातून किमान वेळ काढून काही ना काही व्यायाम नियमितपणे करायला हवा. दुचाकी किंवा चारचाकी चालविताना स्पीड ब्रेकरमुळे मणक्याला धक्के बसतात त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.
