‘कुंभी’च्या मतमोजणीत रंगला चिठ्ठ्यांचा खेळ…

कोल्हापूर : कुंभी कासारी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुंभी कासारी सहकारी कारखान्यावर सत्ता असलेल्या चंद्रदीप नरके यांची सत्ता हलवण्यासाठी यंदा आमदार पी. एन. पाटील यांनी देखील जोर लावल्याने या निवडणुकीत चंद्रदीप नरके आणि पी. एन. पाटील या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. जोरदार प्रचारामुळे यंदा मतदानाच्या आकडेवारीतही वाढ झाल्याचे दिसून आले. करवीर पन्हाळसह पाच तालुक्यातील 105 मतदान केंद्रावर ८२.४५ % मतदान झाले. आज रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. मतपेट्या उघडल्या आणि मतपत्रिकांबरोबर आपल्या नेत्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील यावेळी सापडल्या.

या चिठ्ठ्यांमध्ये मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून विरोधकांना चिमटे देखील दिले आहेत. चंद्रदीप नरके यांची कारखाना चालवायची आणि सभासदांप्रती असलेली तळमळ विरोधी नेत्यांना नाही हे लोकांना माहीत आहे”.,“पुढाऱ्यांनो सत्ता येते अन् जाते सर्वसामान्यांना त्रास देऊ नका, या राज्यात किती आले आणि गेले. तुम्ही ही कायमचे टिकणार नाही…मागे काय घडले विसरू नका…दुसऱ्याला त्रास दिला की पुढचे दिवस वाईट… जैसे करनी वैसे भरीनी”या पद्धतीची अनेक पत्र या मतदान पेटीत मिळाली. देशात लोकशाही असली तरी अनेक जण आपले मत उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत. पण या चिठ्यांच्या माध्यमातून सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या..

🤙 8080365706