
कोल्हापुर : राधानगरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर, गरजूंच्या हाताला काम मिळण्यासाठी लवकरात लवकर एमआय डी सी . सुरु करावी अशी मागणी गोकुळ दुध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांनी आमदार प्रकाश आबिटकर याच्याकडे केली.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जेनेसिस महाविद्यालयात रोजगार मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. तायशेटे म्हणाले, की जिल्हयाच्या एका टोकाला असलेला हा तालुका डोंगरी असून या तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. पर्यटन या विषयाशी संबंधित तालुक्यात सध्या थोडेफार काम सुरु आहे. त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकरांचे चांगले पाठबळ मिळाले आहे. बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी राधानगरी तालुक्यात तातडीने एमआयडीसी सुरु करण्याची गरज आहे,यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी तातडीने पाठपुरावा करावा.
या कार्यक्रमाला राधानगरी तालुक्यातून हजारो संख्येने सुशिक्षीत बेरोजगार, तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जेनेसिस कॉलेज चे विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.
