जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती निधी बाबत मंगळवारी न्यायालयात सुनावणी

कोल्हापूर : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन 2022 23 च्या मंजूर झालेल्या व प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 20 जानेवारी 2023 च्या पत्रांने स्थगिती आदेश दिला होता, त्या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती त्या याचीकेची सुनावणी उद्या मंगळवारी 14 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.

सुनावणीपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या व प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना दिलेली स्थगिती उठवत असल्याचे पत्र जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना दिले आहे, त्या पत्रामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडून निधी प्राप्त झाल्यानंतर कामे सुरू करावेत असे त्या आदेशात नमूद केले आहे.

तसेच कोणत्याही कामांना स्थगिती राहणार नाही असेही त्या पत्रात नमूद केले आहे यावर उद्या होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. माणगाव ग्रामपंचायत च्या वतीने उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरपंच राजू मगदूम हे ग्रामपंचायतच्या वतीने म्हणणे सादर करणार आहेत. याबाबत ओमकार कन्स्ट्रक्शन लाटवडे यांनी याचिका दाखल केली आहे.

🤙 8080365706