महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत जिल्हाअधिकारी यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन

कोल्हापूर: 1996 पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार मागे घेण्यात यावा याबाबतचे निवेदन आज (सोमवारी) संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले आहे की ,रामदास स्वामींचे उदात्तीकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी रामदासी बैठका घेत असतात. हा पुरस्कार धर्माधिकारी यांना देऊन सरकार जातीयवादाचे समर्थन करत आहे. हा पुरस्कार रद्द करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला. यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, विवेक मिठारी, आसीफ स्वार, सुनिल गायकवाड आदि उपस्थित होते.

🤙 8080365706