
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.महापुरुषांच्या बद्दल त्यांनी विधान केले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरुन अवमान केला होता. तेव्हाच संपूर्ण महाराष्ट्र गदारोळ झाला होता,. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली होती. त्यावरून राज्यपाल हटाव ही मोहीमही सुरू झाली होती. तोच मुद्दा हेरून संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल यांचा राजीनामा हा उशिरा सुचलेले शहाणपण आहे असा टोला लगावला आहे.
राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांचा राजीनामा दोन महिन्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा त्यांनी अवमान केला होता, कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची घडी त्यांनी मोडली होती.रमेश बैस हे नवे राज्यपाल असणार आहे, त्या नव्या राज्यपाल यांना शुभेच्छा आहे. महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे, महापुरुषांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्य चालतं आहे त्यामुळे त्याबाबत नव्या राज्यपाल यांना माहिती असायला हवी. असेही ते म्हणाले आहे.
