
कोल्हापूर : वादग्रस्त विधानामुळे वादग्रस्त ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचा राजीनामा राष्ट्रपती कार्यालयाने मंजूर केला आहे. कोशियारी यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या राज्यपाल पदावर रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदावरुन मुक्त करण्याची विनंती केली होती. राज्यपाल कोशियारी यांच्या कामकाजावर विरोधी पक्षाने सातत्याने आवाज उठला होता त्याचबरोबर राजपाल हटाव यावर राज्यभर विरोधकांनी आंदोलन केली होती. राज्यपालांच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षाने राज्यपाल चले जाव अशी मागणी केली होती. सध्या कोल्हापुरातील राज्यपाल कोशियारी यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल कोशियारी यांना निमंत्रित केले होते. दरम्यान कोल्हापुरातील विविध संघटना व शिवसेना ठाकरे गटाने कोशियारी यांच्या कोल्हापूर दौ-याला विरोध केला होता. राज्यपाल यांच्या राजीनामा मंजुरीनंतर नव्या राज्यपाल बदलावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. या आधीच बदल व्हायला हवा होता असं पवार यांनी बोलून दाखवलं.
