जिल्ह्यातील 32 रस्त्यांच्या कामांची स्थगिती हटवून त्वरित मंजुरी द्यावी ; मा.आ. अमल महाडिक यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हयातील २८ रस्त्यांच्या कामांना शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतू काही कारणास्तव सदर कामांना शासनाकडून पुन्हा स्थगिती देण्यात आलेली होती. या रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठवून निधी वर्ग करण्यात यावा, यासाठी मा. आ. अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना भेटून निवेदन दिले.

यावेळी सत्यजित कदम देखील उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हयातील ५०५४ मार्ग व पूल- ०४ प्रमुख जिल्हा मार्ग योजने अंतर्गत १६ कामे अंदाजे रु. ३७.५४ कोटी व ५०५४ मार्ग व पूल ०३ राज्य मार्ग योजने अंतर्गत १२ कामे अंदाजे रु.४५.२० कोटी, असे एकूण रू.८२.७४ कोटी रुपयांच्या २८ रस्त्यांच्या कामांना शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतू सदरच्या कामांना शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती उठवून विकासकामांना गती देण्यासाठी मा.मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

यासोबतच कुंभोज माळवाडी दुधगाव रस्ता प्रजिमा ०.१० किमी १/१०० ते १/५०० ची सुधारणा करणे ७१.२५ लाख, मनपाडळे अंबप वाठार रस्ता प्रजिमा ०.१३ किमी ६/८०० ते ९/५०० ची मजबूतीकरणासह सुधारणा करणे ९५ लाख, पन्हाळा वाठार पेठ वडगाव हातकणंगले इचलकरंजी शिरदवाड ते राज्य हद्दी पर्यंतचा रस्ता रा.मा.क. १९२ किमी ४७/८०० ते ४९/८०० या मध्ये सुधारणा करणे २ कोटी, जिल्हा हद्द ते निलेवाडी नवे पारगांव अंबर वडगांव प्रजिमा क. ९६. किमी १२/३०० ते १४/८०० ची रुंदीकरणासह सुधारणा करणे १.९० कोटी रुपये इत्यादी रस्त्यांची अवस्था देखील अतिशय खराब झाल्याने रस्त्यावरील वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर रस्ते वाहतूकीस योग्य होणे आवश्यक असल्याने सदरच्या रस्त्यांच्या मंजूर असलेल्या कामांवरील स्थगिती उठवून सदर कामांचा निधी तात्काळ वर्ग करणेबाबत संबंधीतांना आदेश देण्याची विनंती अमल महाडिक यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे केली.

🤙 8080365706