अजित पवार मुख्यमंत्री? शरद पवार स्पष्टच बोलले….

नाशिक : राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.पण ‘अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असं पवार पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले.

🤙 8080365706