
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष:
आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होईल. व्यापारात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरीत समाधानी राहाल. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. शासकीय कामे मात्र पुढे ढकलावित.
वृषभ:
बेरोजगारांना रोजगार मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यापारात जोरदार आर्थिक प्रगती होईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. घर, वाहन खरेदीचा योग आहे. मुला-मुलीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आपलं व्यक्तिमत्व बहरून निघेल.
मिथुन:
व्यापारात प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळेल. नोकरीत आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आपलं व्यक्तीमत्व बहरून निघेल.आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे.फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तिची प्रकृती ढासण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा.
कर्क:
नोकरीत कामाचा ताण वाढेल. आळसाचा अतिरेक होईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते. मानसिक क्लेश अस्वस्थता जाणवेल. व्यापारात जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कौटुंबिक पातळीवर अनियोजित खर्च वाढेल. पत्नीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते.
सिंह:
नोकरीत आपल्या मनाजोगे वातावरण निर्माण झाल्याने कामात उत्साह वाटेल. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळणार आहे. बढतीची संधी देखील मिळू शकते. व्यापारीवर्गातील व्यक्तिंना उत्तम धनप्राप्ती होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण दिवस राहील. उत्पन्नात सुधारणा होईल. कायदयाच्या नवीन संधी निर्माण होतील.
कन्या:
आपली कामे नियोजित वेळेत पूर्ण कराल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांची विद्याभासात प्रगती राहील. संततीस यश प्राप्त होईल. नवीन नोकरीच्या मुलाखतीत यश येईल. शैक्षणिक कार्यासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा प्राप्त होईल.
तूळ :
आपण विचारपूर्वकचे निर्णय घ्या. बोलण्यातून गैरसमज वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मानसिक, शारिरिक आरोग्याबाबत अडचणी उद्भवू शकतात.
वृश्चिक:
संततीच्या बाबतीत चिंतीत राहाल. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे.धनू:शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी परदेशी प्रवासाची शक्यता आहे. नवीन योजना आमलात आणाल. व्यापारात नवीन प्रयोग कराल. त्यातून भरपुर आर्थिक फायदा होईल. नवीन योजना व इच्छित कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणी कडून विशेष सहकार्य लाभेल. भौतिक सुखात वाढ होईल.
मकर:
मोठी जबाबदारी पदप्रतिष्ठा लाभणार आहे. शैक्षणिक व बौद्धिक कार्यात मानसन्मान मिळेल. धर्माप्रती आस्था निर्माण होईल. आध्यात्मिक सुखशांती अनुभवाल. सरकारी कामकाज मार्गी लागतील. शासकीय कामात लाभ होईल. राजाश्रय लाभणार आहे. नवीन योजना सफल होतील. परदेशी दौरा सफल होईल.
कुंभ:
आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. संशोधन, साहित्य, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. प्रसिद्धी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मात्र वादविवाद, युक्तिवाद टाळावेत. कार्यात मग्न रहा आपल्या हातून उत्तम कार्य घडेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. त्यांच्याकडून सहकार्य लाभेल.
मीन:
नोकरीत वरिष्ठांकडून अती दबाव मानहानीला सामोरे जावे लागेल. खोटे आरोप,आळ येण्याची शक्यता आहे. कामात तणावपूर्ण वातावरण राहील. गोंधळ वाढेल. धरसोड वृत्ती टाळा. कुटुंबात कलह उत्पन होण्याची शक्यता आहे. पत्नीच्या प्रकृतीबाबत त्रास उदभवेल. आज शक्यतो प्रवास टाळा.
