आर्ट ऑफ लिव्हिंग ‘ने शेतकर्‍याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून दिले

पुणे – जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोचवले. शेतकर्‍याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य केले, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असून शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी केले आहे.

या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी बापू पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.

🤙 8080365706