दोरी उडी मारण्याचे फायदे…

आरोग्य टिप्स : आपण लहानपणी दोरी उडी खेळली असेल. यातून नकळत आपल्या आरोग्यावर अनेक फायदे झालेत. लहान मुलांसाठी हा खेळ जरी असला तरी मोठ्यांसाठी हा व्यायामच म्हणावं लागेल. दोरी उडीमुळे शरीराला अनेक फायदे होतात.

दोरी उडी मारण्याच्या क्रियेत आपल्या शरीराच्या खालच्या भागाचा समावेश होतो. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात.

सतत दोरी उडी मारल्यामुळे हृदयाची गती वाढते. यासह फुफ्फुसाची क्षमता सुधारते.पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज अर्धा तास दोरी उडी मारणे खूप फायदेशीर ठरू शकते. खालच्या भागावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दोरी उडी हा बेस्ट व्यायाम मानला जातो.

एकदा का आपल्याला दोरी उडी मारण्याची सवय लागली की, हा व्यायाम मजेशीर वाटू लागतो. सर्वप्रथम, नियमित ३० सेकंद वार्म अप करा त्यानंतर ३० सेकंद विश्रांती घ्या मग दोरी उडीचे तीन सेट पूर्ण करा.

दररोज दहा मिनिटे दोरी उडी मारल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे हृदयाच्या निगडीत अधिक समस्या उद्भवत नाहीत.दोरी उड्या मारल्याने हाडे मजबूत होतात आणि संतुलनामध्ये लक्ष केंद्रित करते.नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

🤙 8080365706