
मुंबई : राखी ड्रामा क्वीन नाही, तर आदिल खान फसवणूक करणारा निघाला. तो चोर आहे. त्याने राखीला खूप वाईट पद्धतीने मारलंय. असा खुलासा राखीच्या भावाने केला आहे.


राखी खूप हिंमत ठेवून लढत आहे, असं काही घडल्यास कोणत्याही मुलीने घाबरून जाऊ नये, सहन करू नये, हिमतीने सामना करावा,” असंही राखीचा भाऊ म्हणाला.
“आदिलने अनेक मुलींचे आयुष्य बरबाद केले. आदिलने फसवणूक केलेल्या 3-4 मुलींचे फोन राखीला आले आहेत. आम्ही त्या मुलींची नाव सांगू शकत नाहीत. कारण, त्याने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता. आदिल चोर आहे, त्याने राखीची गाडी आणि पैसे घेतले. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून आम्हाला त्याबद्दल आताच कळतंय,” असेही राखीचा भाऊ राकेश याने सांगितले आहे.
