घरफाळा दंडामध्ये सवलत योजना…

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये सवलत योजना दिली आहे.

यामध्ये दि.9 ते 28 फेब्रुवारी 2023 अखेर निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 50 टक्के तर 1 मार्च ते 31 मार्च 2023 अखेर 40 टक्के सवलत असणार आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर अद्याप न भरणा केलेने चालु आर्थिक वर्षात थकीत झाले मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.            

या सवलत योजनेसाठी सवलत योजना जाहीर केले तारखेपासून अंतिम तारखेपर्यंत थकबाकीदाराने त्यांची मूळ थकबाकी, नोटीस व वॉरटं इत्यादीसह एक रक्कमी रोखीने भरल्यास दंड व्याजमध्ये सवलत देण्यात येईल. म्हणजेच मिळकतधारकांने संपूर्ण थकबाकी रक्कम व सुट वजा जाता होणारा दंड व्याज अशी एकूण रक्कम रोखीने भरणा करणे आवश्यक आहे. ज्या मिळकत धारकांची मिळकत थकबाकीपोटी सिल करण्यात आली आहे अशा मिळकतधारकांना हि या सवलत योजनेत सूट देण्यात येणार आहे. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीत कोणतेही प्रलंबित असलेले अपील पुनर्निरीक्षणासाठी आलेले संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घेतले पाहिजे. जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षणासाठी आवेदन, संदर्भ आवेदन, विविध स्तरावरील न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर योजने अंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील. योजना ही दिलेल्या कालावधीत जमा केलेल्या रक्कमांनाच लागू राहील. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना लागू राहणार नाही. योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी या योजने अंतर्गत दावा करता येणार नाही. या योजनेचा लाभ सर्व शासकीय मिळकतींना देखील लागू राहिल.तसेच जे थकबाकीदार मिळकतधारक आपल्या कराचा भरणा करणार नाहीत त्यांच्या मिळकतीवर 1 एप्रिल 2023 पासुन जप्ती व मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आले आहेत व अशी सवलत योजना भविष्यात पुन्हा राबविण्यात येणार नसलेचे स्पष्ट केले आहे. तेंव्हा जास्तीत जास्त करदात्यांनी कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

🤙 8080365706