अखेर कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त ठरला…

कराड : पुणे-बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.या पार्श्‍वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात संबधित विभाग यांची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली.

यानंतर कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा येथे दोन्ही पूलाची पाहणी करून संबधित कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. कराडचा उड्डाणपूल हा आज मध्यरात्रीपासून बंद होणार असून आज बुधवार, दि. ८ दिवसाच पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती डीपी जैन कंपनीचे सतेंद्रा कुमार वर्मा यांनी दिली.कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथील सन २००३ मध्ये बांधलेला उड्डाणपूल जमीनदोस्त होणार आहे. त्याठिकाणी ५५० कोटी रूपये खर्चून 3.2 किलोमीटर अतंराचा सहापदरीकरणचा उड्डाणपूल होणार आहे. या पूलाचे काम अदानी समूहाला दिले असून डीपी जैन ही कंपनी काम करणार आहे. शनिवारी मध्यरात्री म्हणजेच रविवार, दि. 5 रोजी 12 नंतर या उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून वाहतूक सुरू असल्याने नक्की पूल कधी पाडणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. परंतू, आता या प्रोजक्टचे प्रमुख इंजिनिअर सतेंद्रा कुमार वर्मा यांनी अधिकृत माहिती दिली.

🤙 8080365706