
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेषः
व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. व्यवसायातील पत वाढेल. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. वारसा अधिकार मिळेल. विमामुळे लाभ होतील. घर प्रापर्टी खरेदी अचानक घडेल. दुरचे प्रवास घडणार आहेत. नोकरी-व्यवसायानिमिल परदेश प्रवास होतील. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल.
वृषभः
कर्ज प्रकरण मंजूर होतील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल. नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभदिवस आहेमिथुनःव्यापारात आर्थिक लाभ घडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक,आप्तेष्टा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या.भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
कर्कः
नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. आपल्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. शुभ संदेश मिळतील. घरात आप्तेष्ट नातेवाईकांचे आगमन होईल. आत्मसन्मान वाढेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे. मनात प्रसन्नता असेल. सिंहःकाही मनस्तापासारख्या घटना घडतील. ताणतणाव जाणवेल. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावेत. जामीन राहू नका. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. काहीसा अडचणीत आणणारे दिनमान राहील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. धाडसी निर्णय घेऊ नयेत.
कन्याः
पुर्वीचे प्रकल्प व कामे आज आपणास मदतीला येणार आहेत. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. काही नव-नवीन कल्पना आमलात आणा. क्रिएटिव मंडळीसाठी आजचा दिवस स्पेशल आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकरिता आज शुभ योग आहे. शासकीय योजना आणल्या जातील. रखडलेले प्रकल्प पुर्णत्वास जातील.तुलाःनोकरी व्यवसायात प्रगती होण्याचे योगआहेत.काहींना नोकरीत प्रमोशन मिळेल. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे.
वृश्चिकः
सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. आध्यात्मिक, देवधर्म यावर श्रद्धा वाढेल. मंगलकार्य, धार्मिक कार्य घडतील. नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील.वरिष्ठांची मर्जी राखाल.भाग्याची साथ आपणास उत्तम मिळणार आहे.व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक,सौख्य देणारं असेल.व्यापार व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. शासकीय कामकाजात शुभ दिवस आहे.
धनुः
मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बोलघेवडेपणा शक्यतो टाळा. अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी विरोध मतं निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
मकरः
व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.
कुंभः
खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्याने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंदयात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायदा पाहून अविचारी गुंतवणूक करू नका.
मीनः
दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील.नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल.वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे.प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल.
