माणिक यादव लिखित “जसं घडलं तसं” या पुस्तकाचे प्रकाशन

बालिंगा/मोहन कांबळे : फुलेवाडी येथील माने हॉल या ठिकाणी माणिक यादव लिखीत ‘जस घडल तस’ या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले.

याचे प्रकाशन डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी केले. या वेळी बोलतांना ते म्हणाले की, समाजातील विविध वर्गाने लिहितो व्हावं आताच्या आर्थिक सुबत्ता आहे त्याला बघत बघत पिढीने आपल्या मागच्या काळातील संघर्ष विसरु नये. यावेळी प्रमुख पाहुणे शंकर यादव प्रशासकीय अधिकारी महानगरपालिका यांनी पुस्तक वाचनाबरोबर माणसे वाचावीत असे नमुद करून यादव यांनी आपलं जगणं लिहिण्यात मांडून खरेपणा दाखवला आहे कसे प्रस्तावनेत नमुद केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बजरंग लगारे माजी चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर यांनी यादव यांच्या सोबतच्या शालेय सामाजिक कार्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा करून दिला. कार्यक्रमास फुलेवाडी लक्षतीर्थ परिसरातील नागरिक, आजी-माजी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रात तज्ञव्यक्ती, आणिप्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचे संयोजन पायोनियर अकॅडमीने केले होते. आभार सोळगावकर यांनी मांडले.

🤙 8080365706