भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण व नागरी वस्तीचा विकास करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी तब्बल 4 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, राधानगरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या दलित वस्ती मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी या योजनेत निधी मिळावा याबाबत मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघातील कामासाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील विविध गावांतील असलेल्या दलित वस्ती मधील पायाभूत सुविधा उभारता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले आहे.

याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले आहे.यामध्ये राधानगरी तालुक्यातील सोळांकूर 10 लाख, घोटवडे 10 लाख, आकनूर 15 लाख, आवळी खुर्द 10 लाख, सावर्दे (वाकीघोल) 10 लाख, कुडूत्री 10 लाख, लिंगाचीवाडी 10 लाख, पनोरी 15 लाख, तळगांव 15 लाख, पुंगाव 10 लाख, गवशी 15 लाख, मोघर्डे 10 लाख, पाटपन्हाळा 15 लाख, कारीवडे 10 लाख, कारीवडे पैकी डिगस 5 लाख, ओलवण पैकी बोध्दवाडी 5 लाख, धामोड 10 लाख, कौलव 10 लाख, हसणे पैकी तांबेवाडी 20 लाख, गुडाळ 10 लाख, सोन्याची शिरोली 10 लाख आदी गांवाचा समावेश आहे.भुदरगड तालुक्यातील आदमापूर 20 लाख, लोटेवाडी 15 लाख, फये 10 लाख, आकुर्डे 20 लाख, म्हसवे 10 लाख, म्हासरंग 10 लाख, मडिलगे खुर्द 10 लाख, दारवाड 10 लाख, कडगांव 10 लाख आदी गावांचा समावेश आहेआजरा तालुक्यातील कोरीवडे 10 लाख, मसोली 10 लाख, लाटगांव 10 लाख, मेढेवाडी 10 लाख, देवर्डे 10 लाख आदी गावांचा समावेश आहे.

🤙 8080365706