
पुणे: पुण्यातील कसबा पेठ व पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविवारी (दि. 5) सायंकाळपर्यंत निश्चित होतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आग्रही असल्याच्या प्रश्नावर यासंबंधीचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ घेतील, असे उत्तर पवार यांनी दिले.
