
पुणे: भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला असून अग्निवीर भरती प्रक्रिया आता नवीन निकषांवर होणार आहे.

जुन्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता अग्निवीर भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरतीसाठीच्या नवीन प्रक्रियेची जाहीरात जारी केली आहे. त्यानुसार आता अग्निवीर होण्यासाठी पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. अग्निवीर परीक्षा तीन टप्प्यांत होणारअग्निवीर भरती प्रक्रिया आता तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून यामध्ये सीईई, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. या प्रक्रियेचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत हा बदल केला आहे. पहिल्या टप्प्यात सीईई-प्रवेश परीक्षा घेतली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. याबाबत लवकरच नवीन अधिसूचना जारी करण्यात येईल.
