पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कृष्णमूर्ती के पी पद्धत अस्ट्रोलॉजी कार्यशाळेचा शुभारंभ

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णमूर्ती के.पी पद्धत अस्ट्रोलॉजी कार्यशाळेचा शुभारंभ माननीय माजी मुख्याध्यापक विलासराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुरुवातीस दीप प्रज्वलन किनी तालुका हातकणंगले येथील विजयराव गुरव तसेच शिव कृष्ण ज्योतिष मार्गदर्शन च्या सौ शोभाताई शेलार अपर्णाताई सावंत सौ रश्मी विशाल जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विलास जाधव म्हणाले की कृष्णमूर्ती नावाचे संशोधक यांनी भारतीय वैदिक व अस्त्रोलॉजी तंत्रज्ञानामध्ये के पी पद्धत अवलंबिले आणि फल ज्योतिषी अंकशास्त्र व होरा ज्योतिष शास्त्र व के पी पद्धत सांख्यिकी गणित विषय अत्यंत मोलाचे योगदान देऊन नवग्रह आणि त्यांची अंशात्मक गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी यांच्याद्वारे भौमितिक अंका नुसार परफेक्ट मानवाचे भविष्य वर्तवण्यात येते. यामध्ये कृष्णमूर्ती या शास्त्रज्ञानाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे यामुळे या शास्त्राचा भारतीयांनी वापर करावा भारतीय नवीन पिढीमध्ये ज्योतिषी विषयक अज्ञान आणि ज्योतिष हे अज्ञान आहे असे गैरसमज आहे. त्यामुळे कृष्णमूर्ती या शास्त्रज्ञांनी के पी पद्धत महाराष्ट्रातील ज्योतिषी विषयक जाणकार आणि फलित सांगणाऱ्या व्यक्तींनी त्याचा अवलंब करावा अशी विलास जाधव यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले. याविषयी अनेक मान्यवरांची मार्गदर्शन भाषणे झाली.

यावेळी शरद ठाणेकर, सुधीर दुण्डगे, आनंदा पाटील, सुकुमार पाटील, सिद्धार्थ शिंगारे, उमेश चौगुले, शिवाजी टिके, गणेश लोहार, विजय जाधव, मिलिंद चव्हाण, तुषार माने, रेवती शिरोडकर, श्वेता मल्लोळी, अपर्णा सावंत आदी सल्लागार व तज्ञ उपस्थित होते.

🤙 8080365706